अम्मा रिटर्न, जयललिता पाचव्यांदा मुख्यमंत्रिपदी विराजमान

May 23, 2015 12:11 PM0 commentsViews:

jayalaita oath23 मे : बेहिशेबी मालमत्ता प्रकरणातून निर्दोष सुटका झाल्यानंतर अम्मा अर्थात जयललिता पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदावर विराजमान झाल्या आहेत. जयललिता यांनी आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

मद्रास युनिव्हर्सिटीमध्ये हा शपथविधी सोहळा पार पडला. जयललिता यांच्यासोबत 29 आमदारांनीही शपथ घेतली. जयांनी गृह खातं स्वतःकडे ठेवलंय, आणि त्यांच्या आधी मुख्यमंत्री असलेले पण्णीरसेल्वम आता अर्थ खात्याची धुरा सांभाळतील.

तब्बल आठ महिन्यांनतर जयललिता यांचं पुनरागम झालंय. बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी काहीच दिवसांपूर्वी त्यांची निर्दोष मुक्तता झाली. आजच्या या शपथविधी सोहळ्याला सुपरहिरो रजनीकांत यांनीही हजेरी लावली. तामिळनाडू राजकारणातले अनेक दिग्गज उपस्थित होते.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close