सरकारमध्येच सहभागी होणार – प्रफुल पटेल

November 3, 2009 12:53 PM0 commentsViews: 4

3 नोव्हेंबरराष्ट्रवादी काँग्रेस सरकारमध्येच सहभागी होईल, काँग्रेसला बाहेरून पाठिंबा देण्याचा कोणताही विचार नाही, असं राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी नवी दिल्ली येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं. भुजबळांच्या म्हणण्याचा अर्थही बाहेरून पाठिंब्याचा नव्हता. चर्चेचे सर्वाधिकार शरद पवारांनी आपल्याकडे दिले आहेत, असं म्हणत पटेलांनी भुजबळांना चिमटा काढला. मंगळवारी सकाळी अशोक चव्हाण आणि छगन भुजबळ यांनी राज्यपालांची भेट घेतल्यानंतर खातेवाटपावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीतला वाद संपला नसल्याचं स्पष्ट झालं. राष्ट्रवादीने काँग्रेसवर दबाव वाढवायला सुरुवात केली आहे. तर खातेवाटपात एकमत होत नाही, तोपर्यंत सरकारला बाहेरून पाठिंबा देऊ, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं होतं. काँग्रेसला पाठिंबा देण्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचीच दुटप्पी भूमिका यावरून स्पष्ट दिसली.

close