पुण्यात लवकरच सायबर पोलीस स्टेशन !

May 23, 2015 5:18 PM0 commentsViews:

cyber police4523 मे : पुणे शहरात लवकरच स्वतंत्र सायबर पोलीस स्टेशन सुरू केलं जाणार आहे. पुण्याचे पोलीस आयुक्त के.के.पाठक यांनीच ही माहिती दिलीय. पुण्यातले सायबर क्राईमचं वाढतं प्रमाण वेळीच रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय.

शहरातील सोशल फेब्रिकला बाधा न आणता शहरातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचा प्रयत्न असल्याचं पुण्याचे पोलीस आयुक्त के के पाठक यांनी म्हटलंय. शहरात सायबर गुन्ह्यांचं प्रमाण हे अधिक आहे. मात्र, अद्याप पर्यंत एका ही सायबर गुन्हयाच्या मुळाशी पोलिसांना पोहोचता आलेलं नाही असं ही आयुक्तानी मान्य केलं.

ही बाब लक्षात घेऊन विशेष प्रयत्न घेतले जातायेत आणि लवकरच सायबर गुह्यांसाठी वेगळ पोलीस स्टेशन सुरू करण्यात येईल असं आयुक्तानी सांगितलं. शहरात आणखी 6 पोलीस स्टेशन आणि दोन झोनची गरज आहे त्यादृष्टीने प्रयत्न सुरु असल्याचं पाठक यांनी सांगितलं.

विशेष म्हणजे, सायबर क्राईम बँच पुण्यात यापूर्वीच स्थापण्यात आलीय. पण सायबर गुन्हे रोखण्यासाठी थेट पोलीस स्टेशनच स्थापन्याची ही कदाचित पहिलीच वेळ असणार आहे.

(संग्रहित छायाचित्र)

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close