नरिमनमधल्या ज्यूंना मारु नका : इस्राईली दूतावासाने केली होती विनंती

November 3, 2009 1:29 PM0 commentsViews: 1

3 नोव्हेंबर नरिमन हाऊसवर दहशतवादी हल्ला झाल्यावर तिथे रहात असलेल्या ज्यूंना काही करु नका अशी विनंती इस्त्राईली दूतावासातील अधिकार्‍यांनी अतिरेक्यांना केली होती. तुमच्या मागण्या आम्ही भारतीय दुतावासाच्या मार्फत पूर्ण करु असंही त्यांनी यावेळी सांगितलं होतं. मुंबईत 26 नोव्हेंबरला नरिमन हाऊस इथे झालेल्या दहशतवादी हल्लातील अतिरेकी आणि अमेरिकेतल्या इस्त्राईली दूतावासातील अधिकारी यांच्यातील संभाषणाची माहिती कोर्टात सादर करण्यात आली. त्यांच्या या संभाषणांचं टेलिफोनिक रेकॉर्डिंग कोर्टासमोर ठेवण्यात आलं. या अतिरेक्यांनी कोण कोणत्या मागण्या केल्या होत्या, याबाबतही कोर्टात माहिती देण्यात आली.

close