मुल्यांकन करूनच टोलचा निर्णय, मुख्यमंत्र्यांचं टोल समितीला आश्वासन

May 23, 2015 7:30 PM0 commentsViews:

CM ON FLU23 मे : कोल्हापूर शहरातील टोल रद्द कराण्याची मानसिकता सरकारची आहे. रस्ते विकास प्रकल्पाच्या मुल्यांकनानंतर टोल रद्द केला जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय.

कोल्हापूरमध्ये भाजपचं अधिवेशन सुरु झालंय पण टोलविरोधी कृति समिती या अधिवेशन काळात आंदोलन करण्याच्या तयारीत असतानाच मुख्यमंत्र्यांकडून कृति समितिला चर्चेचं निमंत्रण देण्यात आलं.

त्यानुसार शेकापचे ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील यांच्यासह कृती समितीशी मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी हे आश्वासन दिलंय.मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाचं कृती समितीनेही स्वागत केलंय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close