मुंबई गोवा महामार्गावर अपघात; 2 जखमी

May 24, 2015 11:48 AM0 commentsViews:

pune-goa accident

24 मे : मुंबई – गोवा महामार्गावर पेण – हमरापूर फाट्याजवळ आज सकाळी दोन ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातानंतर स्फोट झाला. या दुर्घटनेत दोन जण जखमी झाले आहेत. सकाळी पावणे सहाच्या सुमारास ही घटना घडली.

पेण – हमरापूर फाट्याजवळ दोन ट्रकमध्ये भीषण धडक झाली. या धडकेत सिलेंडर वाहून नेणार्‍या ट्रकमध्ये स्फोट झाल्याने आग लागली. सिलेंडरचे तुकडे सुमारे 100 फुटांपर्यंत उडाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. या अपघातात दोन जण जखमी झाले.

या अपघातामुळे महामार्गावर भीषण वाहतूक कोंडी झाली असून मुंबईकडे येणारी वाहतूक पेण – खोपोली मार्गे वळवण्यात आली आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close