आयर्लंडमध्ये समलैंगिक विवाहाला मान्यता!

May 24, 2015 1:16 PM0 commentsViews:

ireland same sex marriage

24 मे : समलैंगिक विवाहाला कायदेशीर मंजुरी देणारा आयर्लंड हा जगातील पहिला देश ठरला आहे. जनमताच्या माध्यमातून आयर्लंड देशाने हा नवा कायदा एतिहासिक निर्णय घेतला आहे.

समलिंगी विवाहांना कायदेशीर मान्यता द्यावी का, यात घटनादुरूस्ती करण्यासाठी मतदान घेण्यात आले होते. यासाठी देशातील तब्बल साडेतीन लाख नागरिकांनी मतदान केलं असून या मतदानात तब्बल 62 टक्के नागरिकांनी समलैंगिक विवाहाच्या बाजूने मत नोंदवली. त्यामुळे आयरिश सरकारला समलैंगिक विवाहाला परवानगी द्यावी लागली.

विशेष म्हणजे या देशात कॅथॉलिक चर्चचा बराच प्रभाव आहे, आणि कॅथलिक चर्चनं समलैंगिक संबंधांना याआधीच अनैतिक ठरवलं आहे. त्यामुळे आयर्लंडच्या जनतेचा हा निर्णय कट्टर विचारसरणीच्या कॅथॉलिक चर्चला धक्का मानला जात आहे. दरम्यान, सरकारच्या या निर्णयानंतर नागरिकांनी सप्तरंगी झेंडे फडकवत आनंद व्यक्त केला.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close