मुंब्रा बायपासजवळ टँकर उलटल्याने गॅस गळती

May 24, 2015 3:01 PM0 commentsViews:

gas-leakage450

24 मे : सुरतहून तळोज्याला जाणार्‍या अमोनिया गॅसने भरलेल्या टँकरला अपघात झाला आहे. पहाटे दोनच्या सुमारास मुंब्रा बायपासवरून जात असताना टँकर कोसळल्याची घटना घडली.

तब्बल 1450 टन अमोनिया गॅस असलेला एक टँकर मुंब्रा बायपासवरून जाताना कोसळला. अपघातानंतर टँकर हलवलताना टँकरचा वॉल्व निघाला आणि गॅसगळती सुरू झाली आहे. त्यामुळं परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. तसंच या गॅसचा नागरिकांना त्रास होऊ नये, यासाठी जवळपासच्या स्थानिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. यामुळे इथली वाहतूक देखील पुर्णपणे ठप्प झाली आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close