मुंबई अग्निशमन दलाचे अधिकारी सुनील नेसरीकर शहीद

May 24, 2015 6:06 PM0 commentsViews:

193637024 मे : काळबादेवी इथल्या आगीत गंभीर जखमी झालेले मुंबईच्या अग्निशमन दलाचे प्रभारी मुख्य अधिकारी सुनील नेसरीकर यांचे आज (रविवारी) निधन झाले. गेल्या 15 दिवसांपासून नेसरीकर ऐरोलीतील नॅशनल बर्न सेंटरमध्ये मृत्यूशी झुंज देत होते.

मुंबईतील काळबादेवी इथल्या गोकूळ इमारतीला 15 दिवसांपूर्वी म्हणजेच 9 मे रोजी आग लागली होती. ही आग विझवताना दोन जवानांना वीरमरण आलं होतं. तर दोन अधिकारी गंभीर जखमी झाले होते. या आगीत मुंबई अग्निशमन दलाचे अधिकारी सुनील नेसरीकर हे 50 टक्के भाजले होते आणि त्यांच्यावर ऐरोलीतील नॅशनल बर्न सेंटरमध्ये उपचार सुरू होते. काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर त्वचारोपण शस्त्रक्रियाही झाली होती. रविवारी दपारी उपचारादरम्यान नेसरीकर यांचे निधन झाले.

नेसरीकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील. काळबादेवी आगीत सुधीर आमीन यांच्यापाठोपाठ मुंबई अग्निशमन दलातील आणखी एका जिगरबाज अधिकार्‍याचे निधन झाल्याने अग्निशमन दलाला मोठा हादरा बसला आहे.

 

 

कोण होते सुनील नेसरीकर?

  • 2014 पासून प्रभारी मुख्य अग्निशमन दल अधिकारी
  • आधुनिक तंत्रज्ञानाची जाण असलेले अधिकारी
  • लोटस पार्क आगीत महत्त्वाची भूमिका
  • 26/11 च्या हल्ल्यात धाडसी कामगिरी

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close