मुंबई महापालिका निवडणूक भाजप-शिवसेना एकत्र लढवणार! – मुख्यमंत्री

May 24, 2015 7:44 PM0 commentsViews:

fadnavis neqda

24 मे : मुंबई महापालिका निवडणूक भाजप आणि शिवसेना एकत्र लढणार आहेत, अशी महत्त्वाची घोषणा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. शिवसेना आणि भाजपमध्ये सध्या चाललेल्या शाब्दिक चकमकींना लक्षात घेता ही घोषणा महत्त्वाची आहे. स्वतंत्रपणे निवडणुका लढलो नसतो, तर आम्हाला आमची ताकद कधी कळलीच नसती, असं मुख्यमंत्री काल याच कार्यक्रमात म्हणाले होते. त्यावरून बरीच राजकीय चर्चा रंगली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी आज हे स्पष्टीकरण दिलं.

दुसरं म्हणजे येत्या मंत्रिमंडळ विस्तारात घटकपक्षांना स्थान देणार असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले.येत्या महिनाभरात महामंडळांवरच्या प्रलंबित नियुक्त्या करण्यात येईल, असं आश्वासनसुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आपल्या भाषणात दिलं आहे.

आपल्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी गेल्या सहा महिन्यातल्या कार्यकाळातल्या राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयांची यादीच कार्यकर्त्यांसमोर ठेवली. सरकारने घेतलेले निर्णय, सरकारच्या योजना या तळागळापर्यंत पोहोचवण्याचं काम कार्यकर्त्यांनी करायला हवे, असं आवाहनसुद्धा मुख्यमंत्र्यांनी केल. त्यासाठी सोशल मीडियाचा वापर करा. तालुका पातळीवर व्हॉट्सऍप ग्रुप तयार करा, असं आवाहन त्यांनी केलं आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close