मनसेने ‘अँण्टी ख्राईस्ट’ सिनेमा बंद पाडला

November 3, 2009 1:53 PM0 commentsViews: 1

3 नोव्हेंबर अश्लील दृश्य असल्याचा आक्षेप घेत मुंबईत काल मनसेनं 'अँण्टी ख्राईस्ट' हा सिनेमा बंद पाडला. त्यामुळे मुंबईतल्या प्रसिद्ध थिएटर मेट्रो, एरवी सिनेमाप्रेमींची गर्दी असणार्‍या थिएटरबाहेर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. सोमवारी या थिएटरमध्ये मामि फिल्म फेस्टीव्हल दरम्यान डेन्मार्कचा अँटी ख्राईस्ट हा सिनेमा दाखवला जात होता. पण या सिनेमात अश्लील दृश्य दाखवली जात असल्याचा आक्षेप घेत मनसे कारर्यकर्त्यांनी शो बंद पाडला. तसंच मुंबईकरांनी असे सिनेमे पाहू नये असं आवाहन केलं. विधानसभा निवडणुकीतल्या यशानंतर मनसेनं मुंबईत केलेलं हे पहिलंच आंदोलन होतं. पण यावेळी आंदोलनाचा विषय जरा वेगळा असल्याने त्याच्या कारणांची चर्चाही आता सुरू झाली आहे.

close