मोदी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मोदींची आज मथुरेत सभा

May 25, 2015 9:34 AM0 commentsViews:

narendra modi  twitter25 मे : केंद्रातल्या मोदी सरकारला सत्तेवर येऊन आज (सोमवारी) एक वर्ष पूर्ण होतंय. याच निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी मथुरामध्ये रॅली घेणार आहेत. जवळपास एक लाखाहूनही जास्त कार्यकर्ते या सभेला उपस्थित राहणार असल्याचा दावा आयोजकांनी केलाय.

देशभरात 200 मोठ्या आणि 5000 छोट्या सभा घेतल्या जाणार आहेत. त्याची सुरुवात पंतप्रधानांच्या आजच्या सभेपासून होणार आहे. पंडित दिन दयाळ उपाध्याय यांचं जन्मगाव असलेल्या मथुरेच्या नागला चांद्रभान इथं ही सभा होणार आहे. या सभेसाठी उत्तर प्रदेश सरकारनं कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. तसंच मोदी उद्या हरियाणात सभा घेणार आहेत. तर भाजपचे अध्यक्ष अमित शहा बुधवारी सुरतमध्ये सभा घेणार आहेत.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close