मुंबई-अहमदाबाद महामार्गावर बसला अपघातात 11 ठार

May 25, 2015 9:42 AM0 commentsViews:

bus accident425 मे : : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर लक्झरी आणि मिनी लक्झरी बसची समोरासमोर भीषण धडक झाली. आच्छाडजवळ हा भीषण अपघातात घडला असून 11 जण ठार झालेत. आच्छाडजवळ सीमा हॉटेलजवळ हा भीषण अपघात झालाय. या अपघातात 15 ते 20 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तलासरी, वापी आणि सेल्वासामधील दवाखान्यात हलविण्यात आले आहे. गुजरातहून मुंबईकडे जाणारी ही बस मुंबईहून गुजरातकडे जात होती. ही बस समोरून येणार्‍या मिनीबसवर धडकली. हा अपघात इतका भीषण होता की, मिनी बसचा यात चक्काचूर झाला.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close