अग्निशमन दलाचे शहीद अधिकारी सुनील नेसरीकरांना अखेरचा निरोप

May 25, 2015 12:13 PM0 commentsViews:

sunil nesrikar25 मे : काळबादेवी आगीत अग्निशमन दलाचे शहीद अधिकारी सुनील नेसरीकर यांच्यावर चंदनवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यापूर्वी त्यांना भायखळा अग्निशमन केंद्रामध्ये मानवंदना देण्यात आली. यावेळी नेसरीकर कुटुंबियांसोबतच मुंबई महापालिका आयुक्त अजय मेहता, माजी पालिका आयुक्त सीताराम कुंटेही उपस्थित होते.

रविवारी सुनील नेसरीकर यांचं ऐरोलीच्या नॅशनल बर्न हॉस्पिटलमध्ये निधन झालं. काळाबादेवीतल्या आगीमध्ये नेसरीकर 50 टक्के भाजले होते. त्यांच्यावर दोन शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या. पण त्यांचा एक एक अवयव निकामी होत गेला. काल हृदयविकाराचा झटका आला, आणि त्यांचं निधन झालं.

नेसरीकरांच्या पार्थिवावर आता चंदनवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. काळबादेवी आगीत या अगोदर तीन अधिकारी शहीद झाले. आज अग्निशमन दलाच्या जवानांनी आपल्या या लढवय्या अधिकार्‍यांना अखेराचा निरोप दिला.

कोण होते सुनील नेसरीकर?
2014 पासून प्रभारी मुख्य अग्निशमन दल अधिकारी
आधुनिक तंत्रज्ञानाची जाण असलेले अधिकारी
लोटस पार्क आगीत महत्त्वाची भूमिका
26/11 च्या हल्ल्यात धाडसी कामगिरी

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close