युतीने राज्यपालांकडे केली राष्ट्रपती राजवटीची मागणी

November 4, 2009 8:31 AM0 commentsViews: 3

4 नोव्हेंबर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सत्तावाटपाच्या घोळावर टीका करत युतीच्या नेत्यांनी बुधवारी राज्यपालांची भेट घेतली. आणि राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली. भाजपचे गटनेते एकनाथ खडसे, शिवसेनेचे गटनेते सुभाष देसाई, निलम गोर्‍हे आणि इतर आमदारांनी राज्यपालांची भेट घेतली. यावेळी सरकार स्थापनेचा दावा न करता राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी केल्याचं विरोधकांनी सांगितलं. निवडणुकीचे निकाल लागून बारा दिवस उलटून गेले तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं सत्ता स्थापन केलेली नाही. खातेवाटपाचा घोळ आणि महत्त्वाच्या खात्यांच्या रस्सीखेचातच सगळे नेते गुंतले आहेत. जनतेनं स्पष्ट कौल दिल्यानंतरही सत्ता स्थापन होऊ शकली नाही, यामुळे लोकांमध्येही नाराजी आहे.

close