डोंबिवली जवळ गांधीधाम-बंगळूरू एक्सप्रेसला अपघात

November 4, 2009 8:59 AM0 commentsViews: 1

4 नोव्हेंबर डोंबिवली जवळ दिवा-वसई रेल्वे मार्गावर गांधीधाम-बंगळूरू एक्सप्रेसला अपघात झाला आहे. या अपघातात ट्रेनचे 11 डबे रूळावर घसरले. बोगी नंबर ए -1, ए-2, एस-1, एस-2 चं मोठ नुकसान झाल. गुजरातमधील गांधीधाम येथून हि ट्रेन बंगळूरला चालली होती. त्यावेळी वसई-दिवा रेल्वेमार्गावरील डोंबिवली जवळ 'मोठा गावात' हा अपघात झाला. यात 12 जण जखमी झालेत. याच परिसरातील एका व्यक्तीने स्लीपर्स मधून रेल्वेचा मोठा आवाज येत असल्याची तक्रार रेल्वेच्या हेल्प लाईन एसएमएस सर्व्हिसवर अपघातापूर्वी पाठवली होती. पण त्याची दखल रेल्वे प्रशासनानं घेतली नाही. त्यानंतर काही वेळातच त्या ठीकाणी हा अपघात झाला. याच अपघात स्थळापासून 1 किलोमीटर पुढे रेल्वेलाईन जवळ खाडी आहे. सुदैवाने अपघात झाला तेव्हा गाडीचा वेग कमी असल्यानं प्राणहानी टळली. मात्र गाडीच्या 4-5 डब्यांचं मात्र मोठं नुकसान झालं.

close