का गमावले जिगरबाज अधिकारी ?, काळबादेवी आगीचा पंचनामा

May 25, 2015 1:27 PM0 commentsViews:

विनोद राऊत, मुंबई

25 मे : काळबादेवी आग दुर्घटनेत मुंबई अग्निशमन दलानं चार जिगरबाज अधिकारी गमावले. एका आगीच्या घटनेत चार मोठे अधिकारी गमावण्याचा हा पहिलीच घटना आहे. त्यामुळे ब्रिगेडच्या कर्मचार्‍याचं मनोधैर्य खचलय. या घटनेनंतर मुंबई अग्निशमन दलाच्या अनेक समस्यांवर चर्चा सुरू झाली. काळबादेवी आग प्रकरणी 7 सदस्यीय चौकशी समितीची स्थापना करण्यात आली. या समितीचा तपास सुरू आहे. याच अहवालातील काही महत्वाचे मुद्दे आयबीएन लोकमतच्या हाती लागले आहेत. आग नेमकी कशामुळे लागली, इमारतीपर्यंत पोहोचायला का उशीर झाला ?, चार अधिकार्‍यांचा मृत्यू कसा झाला ?, हे सर्व या तपास अहवालातून समोर येतंय.

काळबादेवी आगीच- वास्तव

– 4 वाजून 29 मिनिटाला फायर ब्रिगेडला काळबादेवी परिसरातून आगीसंदर्भात पहिला कॉल आला

– काही वेळातचं मेमनवाडा, फोर्ट फायर स्टेशनमधून फायर इंजिन रवाना, मात्र इंजिन्स ट्रॅफिकमध्ये अडकली

– तब्बल 14 मिनिटांनंतर मेमनवाडा फायर स्टेशनचं पहिलं फायर इंजिन पोहोचलं

– तळमजल्यावर लोक अडकले, तिसर्‍या मजल्यावरून 10 लोकांना वाचवण्यात आलं.

– 5 वाजेपर्यंत त एकूण 10 पुरुष आणि 3 महिलांना बाहेर काढलं

– पोलीस आणि ट्रॅफिक पोलिसांना घटनास्थळी पाचारण करण्यात आलं

संजय राणेंचा वायरलेस मेसेज- ” तळमजला आणि चौथ्या मजल्यावर आग लागली आहे, आजूबाजूच्या इमारतीत ही आग पसरू शकते, अधिक वॉटर टँकर पाठवा”

- उपमुख्य अग्निशमन अधिकारी सुधीर अमीन घटनास्थळी पोहोचले

- सुधीर अमीन यांचा वायरलेस मेसेज- ” इमारतीला आडवे, उभे तडे गेले आहेत. लाकडी बांधकाम पूर्णत: कोसळलं आहे, इमारतीतून अग्निशमन करणं कठीण आहे, बाहेरून अग्निशमन करण्याचं काम सुरू आहे, आतमध्ये मोठ्या प्रमाणात कपड्यांचा साठा आहे. वॉर्ड ऑफिसर, इंजिनीअर्स आणि कामगार पाठवा “

- यानंतर 4 अधिकारी, 16 पंप, 2 रेस्क्यू व्हॅन, 2 जेटी पाठवले

- जवळपास पावनेसहा वाजता मुख्य अग्निशमन अधिकारी सुनिल नेसरीकर घटनास्थळी पोहोचले, इमारतीच्या आत शिरतांना त्यांच्या अंगावर काही भाग कोसळला, अन्य 3 अधिकारी ढिगार्‍याखाली अडकले

- मुख्य अग्निशमन अधिकारी सुनिल नेसरीकर यांना ढिगार्‍याखालून बाहेर काढलं, त्यांना मसिना रुग्णालयात हलवलं.

- सुधीर अमीन यांना ढिगार्‍यातून बाहेर काढलं, जे.जे. हॉस्पिटलला पाठवलं

- परब, उपमुख्य अग्निशमन अधिकारी यांचा वायरलेस मेसेज- ” संपूर्ण इमारत कोसळली आहे, सुरक्षेच्या कारणावरून आजूबाजूच्या इमारती रिकामी केल्या आहेत, अजून जेसीबी मशीन पाठवा.”

- स्टेशन अधिकारी एम.एम. देसाई बेपत्ता

- स्टेशन अधिकारी एम एम देसाई आणि सहायक विभागीय अग्निशमन अधिकारी राणे यांना मृत घोषित करण्यात आलं

- 2.17 मिनीटांनी – आग संपुर्णता आटोक्यात आली

गोकुळ निवासातील आगीची नेमकी कारणं

1) राहण्यासाठी आणि व्यवसायाकरीता इमारतीचा वापर

2) बांधकामात मोठ्या प्रमाणावर लाकडाचा वापर

3) तळमजल्यावरील गोडाऊनमध्ये कपडे, साड्या, सिथेंटिक ड्रेस मटेरिअलचा साठा

4) मोबाईल, बॅटरीचा मोठा साठा होता

5) इमारतीचा पुनर्विकास सुरू होता, त्यामुळे प्लॅस्टिक आणि बांबूचा वापर

6) आग लागली तेव्हा ट्रॅफिकची वेळ होती, त्यामुळे फायर ब्रिगेडचा ताफा तब्बल 12 मिनीटे उशीरा घटनास्थळी पोहोचू शकले

7) अग्निशमन करतांना एलपीजी सिलेंडरचा स्फोट झाला, त्यामुळे आग अधिकचं फैलावली आणि इमारतीला तडे गेले

8) आग आजूबाजूच्या इमारतीत फैलावण्याची शक्यता होती. त्यामुळे सर्व अधिकारी घटनास्थळी पोहोचले

घटनास्थळी अधिकार्‍यांना कोणत्या अडचणी आल्या?

1) आग लागली ती वेळ ट्रॅफिकची होती, त्यामुळे घटनास्थळी पोहोचायला उशीर

2) घटनास्थळी पोहोचल्यावर महत्त्वाचा वेळ आजूबाजूची वाहनं हटवण्यात गेला

3) इमारतीच्या आजूबाजूला मोकळी जागा कमी असल्यामुळे आग विझवण्यात अडचणी

4) लाकडी बांधकामामुळे आणि तळमजल्यावर आग लागल्यानं आतमध्ये प्रवेश करणं कठीण

5) इमारतीचा डागडुजी सुरु असल्यामुळे इमारतीला बांबू आणि प्लॅस्टिक शीटचा वेढा होता

6) गॅस सिलेंडरच्या स्फोटामुळे इमारत कमजोर झाली

7) इमारतीचा काही भाग सारखा कोसळत असल्यामुळे बचावकार्य जोखमीचं

अधिकार्‍यांचा मृत्यू का झाला?

1) आगीची व्याप्ती मोठी असल्यामुळे सर्व वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले

2) इमारतीच्या पश्चिम बाजूनं अधिकार्‍यांनी शिरण्याचा प्रयत्न केला, मात्र वरच्या मजल्याचा काही भाग अचानक कोसळल्यामुळे अधिकारी गाडले गेले

3) या अधिकार्‍यांना बचावासाठी वेळच मिळाला नाही

4) याच वेळी इमारतीपासून थोड्या अंतरावर असलेले अधिकारी मात्र बचावले

 मुंबई फायर ब्रिगेडला कशाची गरज आहे ?

1) मुंबईत 26 नवीन फायर स्टेशनची उभारणी गरजेची.

2) जागा शोधल्यात, मात्र पालिकेनं यासाठी जमीन आरक्षित केली नाही

2) 10 जांगावर मिनीफायर स्टेशनचा उभारण्याची गरज

3) चिंचोळ्या गल्लीतून जाण्यासाठी मिनीफायर इंजिन्सची गरज

4) मुंबईत 6 कमांड सेंटर्सपैकी 3 सुरू आहेत, दोन वापरासाठी तयार, मात्र ते लवकरात लवकर सुरू करणं गरजेच

5) एरिअल लँडर्स, श्वास घेण्याचं उपकरणं, हॅझमेंट वाहनांची गरज

6) महाराष्ट्र फायर कायद्याच्या अंमलबजावणीसाठी सेलच्या स्थापनेची गरज, सध्या भरती प्रक्रियेचा पत्ता नाही

7) अधिकार्‍यांना सतत प्रशिक्षणाची गरज, सध्या कलिना इथ महाराष्ट्र फायर ब्रिगेडची प्रशिक्षण अकादमी तयार आहे, मात्र मुंबई फार ब्रिगेडचे अधिकारी त्याचा वापर करत नाही

7) विभागातील सर्व रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया ताबडतोब हाती घ्यावी

8) 16 मोडकळीस आलेले फायर इंजिन बदलायचे आहेत

9) 81 मीटरच्या 3 हायड्रालिक प्लॅटफॉर्मची गरज

10)90 मीटरची 1 हायड्रालिक प्लॅटफॉर्म घेण्याची गरज

12) क्विक रिस्पॉन्स मल्टिपर्पज व्हेईकल आवश्यक

13) जुने 11 जम्बो वॉटर टँकर्स बदलायचे आहेत

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close