48 तासात सरकार स्थापन करु – अशोक चव्हाण

November 4, 2009 12:34 PM0 commentsViews: 2

4 नोव्हेंबर आता जास्त काळ वाट पाहावी लागणार नाही, येत्या 48 तासात आम्ही सरकार स्थापन करू, अशी ग्वाही काळजीवाहू मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली आहे. मात्र याबाबतचा निर्णय दिल्लीतून होईल, असंही त्यांनी म्हटलं आहे. विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून बारा दिवस झाले तरी सरकार स्थापन न झाल्याने अनेक महत्वाचे निर्णय घेता येत नाहीत. म्हणून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी युतीच्या नेत्यांना राज्यपालांकडे केली आहे. यावर राज्यात सरकार स्थापनेला उशीर होतोय, त्यामुळे घटनात्मक पेच निर्माण होऊन, राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते असं ज्येष्ठ कायदेतज्ञ राम जेठमलानी यांनी म्हटलंआहे.

close