येत्या बुधवारी बारावीचा आॅनलाइन निकाल

May 25, 2015 9:57 PM0 commentsViews:

768712thexamresult25 मे : राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल येत्या बुधवारी, 27 मे रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे.

शिक्षण मंडळाचे अध्यक्ष गंगाधर मम्हाणे यांनी सोमवारी ही माहिती दिली. दुपारी 1 वाजता मंडळाच्या वेबसाईट्सवर विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल पाहता येईल. तसंच त्याच्या पुढील आठवड्यात विद्यार्थ्यांना गुणपत्रिकेची प्रत दिली जाईल. गेल्या काही दिवसांपासून बारावीचा निकाल कधी लागणार, याकडे शैक्षणिक वर्तुळाचे लक्ष लागले होते.

या वेबसाईट्सवर ऑनलाईन निकाल पाहाता येईल
– www.maharesult.nic.in
– www.maharashtraeducation.com
– www.hscresult.mkcl.org
– www.reduff.com/exams

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close