पे अँड पार्कचं कॉन्ट्रक्ट महिला बचतगटांकडे

November 4, 2009 12:40 PM0 commentsViews: 2

4 नोव्हेंबर पे ऍन्ड पार्क च्या कान्ट्रॅक्ट आता महिलांच्या हाती देण्याचा निर्णय ठाणे महानगरपालिकेने घेतला आहे. लवकरच ठाण्यातल्या पे ऍन्ड पार्कची जबाबदारी महिला बचतगटांकडे देण्यात येणार आहे. ठाणे महानगरपालिकेनं असा ठरावच मंजुर केला आहे. महिलांच्या सबलीकरणासाठी हा निर्णय घेतल्याचं ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त बी. जी. पवार यांनी सांगितलं. ठाण्यात जवळपास 120 पार्किंग लॉट हे महागनरपालिकेचे आहेत. त्यापैकी जवळपास 64 पार्किंग लॉट हे महिला बचतगटांना चालवण्यासाठी देण्यात येणार आहेत. महानगरपालिकेच्या या निर्णयाच नागरिकांनाही स्वागत केलं आहे. पार्किंग लॉट अशा प्रकारे महिला बचतगटांना चालवायला देणारी ठाणे ही देशातली पहिली महागनरपालिका ठरली आहे.

close