काँग्रेसकडून आज ‘अच्छे दिन’ची पुण्यतिथी

May 26, 2015 10:47 AM0 commentsViews:

bjp vs congress26 मे : सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त भाजपमध्ये उत्साह आहे तर काँग्रेस आज भाजपवर टीका करण्याच्या मनस्थितीत आहे. महाराष्ट्र काँग्रेस आजच्या दिवशी ‘अच्छे दिन’ची पुण्यतिथी साजरी करणार आहे.

काँग्रेसच्या वतीने सकाळी 11 वाजता गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान असा मोर्चा काढण्यात येणार आहे. तसंच पुण्यात नरपतगिरी चौकात निदर्शनं कऱण्यात येणार आहेत.काँग्रेसकडून मोदी सरकारचं प्रगती पुस्तक तयार करण्यात येणार आहे. तर दिल्लीत जंतरमंतरवर काँग्रेसतर्फे निदर्शनं होणार आहेत.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close