स्विस बँकेकडून खातेदारांची नावं जाहीर, दोन भारतीय महिलांचा समावेश

May 26, 2015 11:20 AM0 commentsViews:

swess bank26 मे : काळ्या पैशाबाबत स्वित्झर्लंडने स्विस बँकेतील खातेदारांचा मोठा खुलासा केलाय. स्विस बँकेकडून काळा पैसा असल्याचा संशय असलेल्या दोन खातेदारांची नावं जाहीर केलीये. यात दोन महिलांचा समावेश आहे. आणि या दोन्ही महिला भारतीय आहे. या प्रकरणी चौकशी करणार्‍या भारतीय एसआयटीचं हे मोठं यश मानलं जात आहे.

स्विस बँकेत खाते असलेल्या या दोन महिलांची नाव स्नेहलता साहनी आणि संगीत साहनी आहे. स्विस बँकेनं या खातेदारांच्या नावासह जन्म तारीख सुद्धा जाहीर केली. पण, यापुढील माहिती गोपनिय ठेवण्यात आलीये. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वित्झर्लंडने ज्या खातेदारांविरोधात चौकशी सुरू आहे. त्यांचीच नाव जाहीर केलीये. स्विस टॅक्स अडमिनिस्ट्रेशनने दोन्ही भारतीयांना 30 दिवसांच्या आत अपील करण्याची सूचना केलीये अन्यथा भारताला अकाऊंट्सबद्दलची माहिती देण्याचा स्विस बँकेने इशारा दिलाय. स्विस बँकेनं ब्रिटन, स्पेन आणि रशियासह अन्य देशातील विदेशी खातेदारांची नाव जाहीर केलीये. पण, अमेरिका आणि इस्राईली नागरिकांची नाव जाहीर केली नाही. फक्त जन्मतारीख आणि नावाचं पहिलं अक्षर जाहीर केलंय. दरम्यान, SIT च्या म्हणण्यानुसार स्विस बँकेत 4,449 कोटी रुपये आहेत. 340 भारतीयांच्या स्विस बँकेतल्या खात्यांमध्ये काळंबेरं असल्याचं स्वित्झर्लंडनं मान्य केलंय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close