सोनसाखळी चोराचा उच्छाद, मंगळसूत्र खेचताना महिलेला नेलं फरफटत

May 26, 2015 11:38 AM0 commentsViews:

kayal choar26 मे : सोनसाखळी चोरांची मजल थेट नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचलीये. याचा प्रत्यय कल्याणकरांना आलाय. कल्याण इथल्या कासारहाट परिसरात चोरट्यांनी विठ्ठल मंदिरासमोर राहणार्‍या हेमलता ईशवाड या महिलेच्या गळ्यातलं मंगळसूत्र त्याच्या दारातूनच खेचून पळ काढला. मंगळसूत्र खेचताना हेमलता ईशवाड यांना चोरट्यांनी अक्षरश फरफटत नेले. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय.

काल रात्री नऊ वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला, हेमलता ईशवाड दारात उभ्या असतांना पत्ता विचारण्याच्या बहाण्याने ही व्यक्ती तिथे आली आणि त्यानं सोनसाखळी खेचली. हेमलता यांचा मुलगा त्या चोरांच्या मागे धावला मात्र सोनसाखळी चोर तेथून पसार झाले.

या घटनेने पुन्हा एकदा कल्याण डोंबिवलीत सोनसाखळी चोरांवर अंकुश ठेवण्यात पोलिसांना सपशेल अपयश आल्याचे दिसून आलंय. पोलीस नागरिकांनी सीसीटीव्ही लावण्याचे आवाहन करत आहेत, मात्र त्या सीसीटीव्हीमध्ये फक्त चोरी करताना चोर बघायचे का ? असा सवाल नागरिक विचारात आहेत.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close