फुगा फुटला, विमानतळावर ‘ते’ पॅराशुट्स नव्हे तर एअर बलून !

May 26, 2015 12:27 PM0 commentsViews:

air balun_airport26 मे : मुंबई एअरपोर्ट परिसरात आढळलेले मानवविरहित पॅराशुट्समुळे एकच खळबळ उडाली होती अखेर हे पॅराशुट्स नसून एअर बलून
असल्याचं स्पष्ट झालंय. एका डायमंड कंपनीनं आयोजित केलेल्या क्रिकेट मॅचच्या ब्रँडिंगसाठी हे एअर बलून सोडण्यात आले होते. या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आलीये.

मुंबई विमानतळावर शनिवारी संध्याकाळी 5.55 वाजता जेट एअरवेजचे पायलट कॅप्टन दिनेश कुमार यांनी विमानतळावर पहिल्यांदा हे पॅराशूट्स पाहिले. त्यांनी तात्काळ एअरपोर्ट पोलिसांकडे माहिती कळवली. त्यानंतर खुद्द, पंतप्रधान कार्यालयाने याची दखल घेऊन भारतीय वायुसेना, नौसेना, गुप्तचर संस्था, सीईएसएफ आणि मुंबई पोलिसांकडून खुलासा मागवला होता. मुंबई पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली. शहरातील सर्व मान्यताप्राप्त पॅराग्लायडिंग संस्थेचा तपास सुरू केलाय. या प्रकरणी एअर ट्रॅफिक कंट्रोल अधिकार्‍यांची चौकशी केली. अखेरीस 24 तासांच्या आता मुंबई पोलिसांनी घटनेचा छडा लावला. ते पाच मानवरहित पॅराशूट्स नव्हते तर एअर बलून होते अशी माहिती समोर येताच सुरक्षा यंत्रणेचा जीव भांड्यात पडला. एका डायमंड कंपनीनं कलिना कॅम्पस भागात आयोजित केलेल्या क्रिकेट मॅचच्या ब्रँडिंगसाठी हे एअर बलून आकाशात सोडले होते. पोलिसांनी या प्रकरणी दोघांना ताब्यातही घेतलंय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close