बीएमसीच्या कॉन्ट्रॅक्ट्समध्ये मराठी लोकांना प्राधान्य देणार

November 4, 2009 12:42 PM0 commentsViews: 5

4 नोव्हेंबर मनसेच्या बाजूने मराठी माणसाची लाट आल्यानंतर पालिकेत कंत्राट काढताना मराठी लोकांना प्राधान्य देणार असल्याची भुमिका शिवसेनेनं घेतली आहे. फुटपाथ, मोकळ्या जागा, चौक अशा ठिकाणी वस्तुंची विक्री करणार्‍या फेरिवाल्यांकरता हॉकर्स झोन बनवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं टेंडर काढण्यात येणार आहे. महिनाभरात हा प्रस्ताव सभागृहात चर्चेसाठी येणार आहे. हे टेंडर काढताना मराठी कंत्राटदारांना विशेष प्राधान्य देण्याचा प्रस्ताव प्रशासनानं आणला आहे. पण पालिकेत शिवसेना-भाजप सत्तेत असल्यामुळे या प्रस्तावामागे शिवसेनाच असल्याचं स्पष्ट आहे. पालिकेत प्रमुख साठ कंत्राटदार आहेत. त्यापैकी युनिटी कंस्ट्रकशनचे किशोर अवर्सेकर आणि प्रतिभा कंस्ट्रकशनचे अभिजीत कुलकर्णी हे दोनच मराठी कंत्राटदार आहेत. लोकसभेनंतर विधानसभेतही मनसेनं दणका दिल्यानंतर शिवसेनेनं आता कंबर कसली आहे.

close