महापौरांच्या पक्षावरुन नाशिक महानगरपालिकेत गदारोळ

November 4, 2009 12:51 PM0 commentsViews: 4

4 नोव्हेंबरमहापौर कोणत्या पक्षाचे या मुद्यावरुन नाशिक महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गदारोळ माजला. शिवसेना पुरस्कृत नाशिकचे महापौर विनायक पांडे यांनी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यानंतर पहिल्यांदाच झालेल्या महासभेत शिवसेना-भाजपच्या नगरसेवकांनी महापौर कोणाचे, याचा खुलासा मागितला. दोन तास चाललेल्या या गदारोळानंतर शिवसेनेचे नगरसेवक अस्लाम मुनियार आणि अपक्ष नगरसेवक शिवा भागवत यांच्यात हमरीतुमरी झाली. शेवटी महापौरांनी गुरूवारी दुपारपर्यंत सभा तहकूब केली. गुरूवारीही असाच प्रकार घडल्यास, रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेसने दिला आहे.

close