हज हाऊसविरोधात मनसेचं आंदोलन

November 4, 2009 12:52 PM0 commentsViews: 3

4 नोव्हेंबर बुधवारी मुंबईत हज हाऊस कमिटी विरोधात मनसेनं आंदोलन केलं. महाराष्ट्रातून हज यात्रेला जाणार्‍या यात्रेकरुंचा कोटा फक्त सात हजार असल्याने तो दहा हजार करावं या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनामुळे हज कमिटीने यात्रेकरुंचा कोटा दहा हजार करण्याचा निर्णय घेतला असल्याचा दावाही मनसेनं यावेळी केला. तसंच हजहाऊस मध्ये मंत्र्यांच्या आशिर्वादाने भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप मनसेनं केला आहे.

close