भाजपचं घूमजाव?, ‘वेगळ्या विदर्भाचं आश्वासन दिलंच नव्हतं’ !

May 26, 2015 2:08 PM0 commentsViews:

amit shah on vidarbha26 मे : ‘अच्छे दिन’चं आश्वासन देणार्‍या मोदी सरकारची आज वर्षपूर्ती…देशभरात भाजपचे कार्यकर्ते आनंदोत्सव साजरा करत आहे. पण, वर्षभरातच भाजपने दिलेल्या आश्वासनाचा खुद्द भाजपाध्यक्ष अमित शहांना विसर पडलाय. आम्ही वेगळ्या विदर्भाबद्दल असं कोणतही आश्वासनं दिलं नव्हतं असा दावाचा शहा यांनी केलाय. ते दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते.

मागील वर्षी मोदी लाटेवर स्वार झालेल्या भाजपचं सत्तेत येण्याचं स्वप्न साकार झालं. नरेंद्र मोदी यांच्या करिश्माई नेतृत्वामुळे 10 वर्षांनंतर भाजप संपूर्ण बहुमताने सत्तेवर विराजमान झालं. ‘अच्छे दिन’, ‘सबका साथ…सबका विकास’अशी अनेक आश्वासनं मोदींनी दिली. महाराष्ट्रातही भाजपने आश्वासनाचा पाऊस पाडला. त्यात वेगळ्या विदर्भाचा मुद्या अजेंड्यावर होता.

खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच छोट्या राज्याची निमिर्ती व्हावी आणि आम्ही त्या बाजून आहोत अशी भूमिका मांडली होती. एवढंच नाहीतर विदर्भातील भाजप नेत्यांनी लोकसभेत वेगळ्या विदर्भासाठी प्रस्तावही मांडले.

पण, आज वर्षपूर्तीनिमित दिल्लीत पत्रकार परिषदेत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी वेगळ्या विदर्भाचा दावाच खोडून काढला. पत्रकारांनी वेगळ्या विदर्भाबद्दल विचारले असता अमित शहा म्हणाले, आम्ही वेगळ्या विदर्भाचा दावा केला नव्हता. त्याबद्दल जाहिरनाम्यातही उल्लेख केला नव्हतं असं स्पष्ट करून टाकलं. तर दुसरीकडे भाजप छोट्या राज्यांच्या निर्मितीच्या बाजूनं आहे असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी म्हटलंय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close