पंतप्रधान मोदींच्या हस्ते किसान वाहिनीचं उद्घाटन

May 26, 2015 6:20 PM0 commentsViews:

narendra modi erjhjesar

26 मे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘डीडी किसान’ या चॅनलचे आज (मंगळवारी) उद्घाटन करण्यात आलं. ‘डीडी किसान’या चॅनल हा शेती व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी सुरू करण्यात आला आहे. हा चॅनल शेतकर्‍यांसाठी 24 तास सुरू असणार आहे.

शेती करणार्‍यांना सन्मान मिळायला हवा. शेती व्यवसाय उत्तम समजला जात होता. पण आता चक्र फिरले असून, त्याला कमी समजलं जात आहे. हे चक्र पुन्हा एकदा आम्ही उलटू. देशाला पुढे न्यायचे असेल तर गावाला पुढे घेऊन जावं लागेल. जर, गावाला पुढे न्यायचे असेल तर गावातील शेतकर्‍याला पुढे न्यावं लागेल, असं मत नरेंद्र मोदींनी व्यक्त केलं आहे.

दरम्यान, केबल आणि डायरेक्ट टू होम (डीटीएच) सेवा पुरवठादारांसाठी या चॅनलचं प्रक्षेपण करणं बंधनकारक असेल. ‘प्रत्येक राज्यात शेतकरी आहेत. त्यामुळे केबल कायद्यानुसार डीडी किसान ही ‘मस्ट कॅरी’ वाहिनी बनवण्यात आला आहे. त्यामुळे त्याचं प्रक्षेपण करणं सर्वांसाठी बंधनकारक आहे, असं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अरुण जेटली यांनी सांगितलं.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close