भाजपचं एका वर्षातच आश्वासनांवरून घूमजाव

May 26, 2015 9:19 PM0 commentsViews:

amit shah adlbakjrh

26 मे : मोदी सरकारला आज एक वर्ष पूर्ण झालं आणि वर्षभरातच भाजपनं आपल्या काही महत्त्वाच्या निकालांवरून घूमजाव केलं आहे. वेगळ्या विदर्भाचं आश्वासन आपण दिलेलंच नव्हतं, असं आज भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी म्हटलं. तर पुणे मेट्रो कधी मार्गी लागेल हे सांगता येत नाही, असं केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात नागपूरचे भाजपचे उमेदवार नितीन गडकरी यांनी सेल्फ डिक्लेरेशनद्वारे आपण निवडून आल्यावर वेगळ्या विदर्भासाठी प्रयत्न करू आणि लोकसभेतसुद्धा या विषयाचा पाठपुरावा करू, असं आश्वासन दिलं होतं. पण आता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी भाजपने कधीही वेगळ्या विदर्भाचे आश्वासन दिलं नव्हतं, असं सांगूत घूमजाव केले आहे.

व्यंकय्या नायडू यांनी स्वतंत्र विदर्भाला आमचा पाठिंबा आहे, ही वस्तुस्थिती आहे. मात्र, आमच्या मित्रपक्षाचा म्हणजेच सेनेचा त्याला कडवा विरोध आहे. शिवसेना हा सरकारमधील सहकारी पक्ष आहे. महाराष्ट्रातील सरकार हे कोणत्याही एका पक्षाचे सरकार नसून, ते युतीचे सरकार आहे. त्यामुळे आमचा विदर्भाचा अजेंडा आम्ही शिवसेनेवर थोपवू शकत नाही, असं सबब दिली आहे.

तर भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सारवासारव केली. छोट्या राज्यांना आमचा पाठिंबा आहे. पण राजकारणासाठी वेगळ्या विदर्भाला पाठिंबा देणार नाही, असं दानवे यांनी म्हटलं.

लोकसभा निवडणूक प्रचारात व्यंकय्या नायडू यांनी पुण्यात पुणे मेट्रोविषयी आश्वासन दिलं होतं. ऑक्टोबर 2015पर्यंत पुणे मेट्रोतल्या मार्गातले सर्व अडथळे दूर करू, असं नायडू यांनी म्हटलं होतं. पण त्याच व्यंकय्या नायडू यांनी आज वर्षपूर्तीच्या दिवशी घूमजाव केलं आहे. पुणे मेट्रो कधी मार्गी लागेल, हे सांगता येत नाही, असं नायडू यांनी म्हटलं आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close