छोट्या नवरानवरीच्या लग्नाची अनोखी गोष्टी!

May 26, 2015 10:02 PM0 commentsViews:

दीपक बोरसे, धुळे

26 मे : लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात, असं म्हणतात. याचाच प्रत्यय धुळ्यातल्या बलसाण्यात आला आहे. ही गोष्ट आहे उंचीनं कमी असलेल्या छोट्या नवरानवरीची. साडेतीन फुटाचा नवरा धीरज आणि त्याची नवरी पूजा हे दोघं लग्नाच्या बंधनात बांधले गेले…

धीरज छाजेड धुळ्यातील दोंडाईचा आहे. त्याची उंची तीन फूट 10 इंच. त्यामुळेच योग्य जीवनसाथी मिळेल का याची चिंता त्याला होती. पण त्याला अखेर त्याची सहचारिणी सापडली तीही थेट 300 किलोमीटर दूर असलेल्या मध्य प्रदेशातल्या झाम्बुवा गावात. इथले प्रवीण खुराणा त्यांच्या मुलीसाठी म्हणजे पूजासाठी अशाच वराच्या शोधात होते. पूजाची उंची आहे तीन फुटाची. त्यामुळे ही अगदी रब ने बना दी जोडी ठरली.

उंचीचा कोणताही न्यूनगंड न बाळगता धीरज आणि पूजा आपापल्या क्षेत्रात कार्यरत आहेत. धीरज शेअर मार्केटमध्ये काम करतो तर पूजाही आपल्या गावी एक सुपर मार्केट चालवायची. आईवडिलांची लाडकी असणारी पूजा आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी आहे आणि म्हणूनच सगळ्यांपेक्षा अगदी वेगळ्या असणार्‍या आपल्या या मुलीचा तिच्या वडिलांना अभिमानच वाटतो.

धीरजचा भाऊ विकास हासुद्धा उंचीनं असाच कमी आहे. त्याचं लग्न 10 वर्षांपूर्वी झालं. हे दोघं भाऊही आपापल्या उद्योगात यशस्वी आहेत. उंचीनं कमी असल्याचा कमीपणा त्यांना वाटत नाही. उलट त्यांचं घरंही या भावांनी आपल्या सोयीप्रमाणे बनवून घेतलं आहे.

वरात, वर्‍हाडी, जेवण असं साग्रसंगीत झालेलं धीरज आणि पूजाचं लग्नं संपूर्ण जिल्ह्यात उत्सुकतेचा विषय ठरलं होतं आणि त्याचे साक्षीदार होण्यासाठी त्यांचे जीवलगही आवर्जून हजर होते.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close