डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या मारेकर्‍यांची रेखाचित्रं नव्यानं प्रसिद्ध

May 27, 2015 10:58 AM0 commentsViews:

SKCHES

27 मे : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक, कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणातील 2 मारेकर्‍यांची नवी रेखाचित्रं सीबीआयने तयार केली आहेत. त्यामुळे तब्बल 21 महिन्यांनंतर दाभोलकरांचे मारेकरी सापडण्याची एक नवी आशा निर्माण झाली आहे.

6 प्रत्यक्षदशीर्ंच्या मदतीने सीबीआयने 2 मारेकर्‍यांची रेखाचित्रं तयार केली असून, ती अधिक स्पष्ट असल्याने मारेकर्‍यांचा शोध लागण्यास मदत होईल असा विश्वास सीबीआयकडून व्यक्त करण्यात आला आहे.

दरम्यान, डॉ. दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणातील पुणे पोलिसांचा 5 महिन्यांचा तपास बाजूला ठेवत सीबीआयने या प्रकरणात नव्याने तपास सुरू केला आहे. त्याचबरोबर सीबीआयने तयार केलेली रेखाचित्रे ही पुणे पोलिसांनी तयार केलेल्या रेखाचित्रांपेक्षा अधिक स्पष्ट आहेत.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close