शिवसेना भाजपमधला ‘सामना’ अजूनही सुरूच!

May 27, 2015 9:33 AM0 commentsViews:

Uddhav-fadnavis

27  मे : कर्तव्यतत्परतेपेक्षा काही ठिकाणची जनता वरवरच्या मेकअपला भुलली. शिवसेना चेहर्‍यावर मुखवटे व मेकअपचे पुढे कधीच चढवत नाही असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारला एक वर्ष पुर्ण झालेलं असताना शिवसेनेचा मात्र भाजपशी अजुनही ‘सामना’ सुरूच आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून पुन्हा एकदा फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कणखर भूमिका घेतली नाही तर शेजारील राज्य मुंबईसह महाराष्ट्राच्या चेहर्‍यावरील ‘मेकअप’ही खरवडून नेतील व राज्याचा चेहरा भेसूर होईल असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

काँग्रेस – राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारचे उच्चाटन करण्यासाठी शिवसेनेनेही जीवाचे रान केले होते, पण कर्तव्यतत्परतेपेक्षा काही ठिकाणची जनता वरवरच्या मेकअपला भुलली. शिवसेना चेहर्‍यावर मुखवटे व मेकअपचे पुढे कधीच चढवत नाही असेही त्यांनी नमूद केलं. राज्यात शिवसेनेचा आवाज बुलंद होता आणि राहणार, 5 – 10 आमदार वाढले अथवा घटले म्हणून आमच्या ताकदीच्या बेडकुळ्या कधीच फुगत नाही असा टोलाही त्यांनी भाजपाला लगावला आहे.

तसंच कोकणातील रोजगार, शेती आणि लोकांच्या जीवनात विध्वंस घडवणार्‍या जैतापूर प्रकल्पाला विरोध करणे हेदेखील राष्ट्रहिताचेच काम आहे असे सांगत उद्धव ठाकरेंनी जैतापूर विरोध कायम राहणार असल्याचे स्पष्ट केलं.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close