दारुबंदी असलेल्या वर्ध्यात पोलिसांची व्हॅनमध्येच दारू पार्टी

May 27, 2015 1:43 PM0 commentsViews:

vardha daru party

27  मे : वर्ध्या जिल्ह्यात दारूबंदी असताना पोलिसांनीच दारू पार्टी केल्याचा प्रकार घडलाय. धक्कादायक म्हणजे ज्या पोलिसांना देण्यात आलेल्या व्हॅनमध्येच ही पार्टी रंगली होती.

वर्धा जिल्ह्यातील सुरगाव इथे नागपूरच्या एका पोलीस कर्मचार्‍याच्या मुलाचं लग्न होतं. लग्न समारंभासाठी नागपूर पोलीस 3 मोठ्या गाड्यातून दाखल झाले होते. पण लग्न सोहळा सुरू असतानाच काही पोलीस कर्मचार्‍यांनी चक्क पोलीस व्हॅनमध्येच दारु पार्टी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहेत.

विशेष म्हणजे बापू-विनोबांच्या नावाने प्रसिद्ध असणार्‍या वर्धा जिल्ह्यात दारुबंदी आहेत. हे माहित असताना पोलीस कर्मचार्‍यांनी पोलीस व्हॅनमध्येच मद्यपान केल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close