बारावीच्या निकालात पुन्हा ‘कोकणस्थ’, पुन्हा मुली अव्वल !

May 27, 2015 1:38 PM0 commentsViews:

12th result 201527 मे : मार्च-2015 मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज (बुधवारी) जाहीर करण्यात आला. यंदा संपूर्ण राज्याचा 91.26 टक्के निकाल लागलाय. तर मुलींनी यंदाही बाजी मारली असून, 94.29 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर उत्तीर्ण झालेल्या मुलांची टक्केवारी 88.80 इतकी आहे.

कोकण विभागाने पुन्हा एकदा सरशी केलीये. सलग चौथ्यांदा कोकण विभागाने अव्वल स्थान कायम राखले आहे. कोकण विभागाचा सर्वाधिक 95 टक्के निकाल लागलाय. त्यापाठोपाठ अमरावती विभाग दुसर्‍या क्रमांकवर असून 92.50 टक्के निकाल लागलाय. आणि नागपूर विभागाने तिसर्‍या क्रमांकवर झेप घेतलीये. नागपूर विभागाचा 92.11 टक्के निकाल लागलाय. तर, सर्वात कमी 88.13 टक्के निकाल हा नाशिक विभागाचा लागला आहे. याबाबतची माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने पत्रकार परिषदेत दिली.

निकाल कुठे पाहणार ?

दुपारी 1 वाजता मंडळाच्या वेबसाईट्सवर विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल पाहता येणार आहे. यंदा राज्यातून तब्बल 13 लाख 39 हजार 99 विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली. पुढच्या आठवड्यात विद्यार्थ्यांना गुणपत्रिकेची प्रत त्यांच्या कॉलेजमध्ये दिली जाईल.

या वेबसाईट्सवर ऑनलाईन निकाल पाहाता येईल :

बारावीचा निकाल

– राज्याचाएकूण निकाल 91.26 टक्के
– मुलींनी मारली बाजी 94.29 टक्के मुली उत्तीर्ण
– 88.80 मुलं उत्तीर्ण

विभागवार निकाल

पुणे विभागाचा 91.96 टक्के
नागपूर विभागाचा 92.11 टक्के
औरंगाबाद विभागाचा 91.77 टक्के
मुंबई विभागाचा 90.11 टक्के
कोल्हापूर विभागाचा 92.13 टक्के
अमरावती विभागाचा 92.50 टक्के
नाशिक विभागाचा 88.13 टक्के
लातूर विभागाचा 91.93 टक्के
कोकण विभागाचा 95.68 टक्के

(संग्रहित छायाचित्र)

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close