मुंबईकरांना दिलासा, 500 स्क्वेअर फुटांच्या घरांना मालमत्ता कर नाही !

May 27, 2015 2:35 PM0 commentsViews:

mumbai home tax27 मे : राज्य सरकारनं मुंबईकरांना मोठा दिलासा दिलाय. मालमत्ता कर 40 टक्क्यांनी वाढवण्यात येणार असला तरी जी घरं 500 स्क्वेअर फुटांच्या आत आहेत, त्यांना ही वाढ पुढची पाच वर्षं लागू होणार नाहीये. मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली.

निवासी इमरातींमधली घरं आणि गाळे यांना हा नियम लागू होईल. या निर्णयाचा लाभ जवळपास 17 लाख घरधारकांना होणार आहे, असं सरकारचं म्हणणं आहे.

दरम्यान, मुंबईत जी घरं 500 स्क्वेअर फूटाच्या आतली आहेत, त्यांत मध्यमवर्गीय गटाची संख्या जास्त आहेत. यामधल्या अनेक इमारती पुनर्बांधणीसाठीही गेल्या आहेत. नव्या इमारतीचा मालमत्ता कर तुलनेनं जास्त असतो.

500 स्क्वेअर फुटाच्या आतली नवी घरंही या नियमात आहेत. या कारणानंही हा मध्यमवर्गीय मुंबईकरांना मोठा दिलासा आहे. 2017 साली होणार्‍या मुंबई महानगरपालिका निवडणुकींना डोळ्यासमोर ठेऊन सरकारनं हा निर्णय घेतलाय का, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close