ऑस्ट्रेलियाचा मोजेस हेन्रिक्स दुखापतग्रस्त

November 4, 2009 1:35 PM0 commentsViews: 7

4 नोव्हेंबर ऑस्ट्रेलिया टीमचा ऑलराऊंडर मोजेस हेन्रिक्स दुखापतग्रस्त झाला आहे. ऑस्ट्रेलियन टीमची तयारी सुरु असतानाच टीमला आणखी एक धक्का बसला आहे. भारत दौर्‍यात दुखापतग्रस्त झालेला हा ऑस्ट्रेलियाचा पाचवा प्लेअर आहे. याआधी ब्रेट ली, जेम्स होप्स, पीटर सीडेल आणि टीम पेन दुखापतीमुळे मायदेशी परतले आहेत. यामुळे पाचव्या वन डेत अकरा प्लेअर निवडण्याचं संकट ऑस्ट्रेलियन कॅप्टन रिकी पॉण्टिंगसमोर असेल. दुखापतीमुळे मायदेशी परतलेल्या जेम्स होप्सच्या जागी हेन्रिक्सची टीममध्ये वर्णी लागली होती. मात्र त्यालाही टीमबाहेर बसावं लागलंय.

close