काँग्रेसला पराभव पचवता आला नाही म्हणून टीका, मोदींचा पलटवार

May 27, 2015 4:46 PM0 commentsViews:

narendra modi on rahul gandhi27 मे : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत सोनिया आणि राहुल गांधींवर सडकून टीका केली. ‘सूट बूट की सरकार’, या राहुल गांधींच्या टीकेला मोदींनी उत्तर दिलं. काँग्रेसला आपला दारूण पराभव पचवता आलेला नाही आणि म्हणून ते अशी टीका करतायत असा पलटवार नरेंद्र मोदींनी केलाय.

तसंच पंतप्रधान कार्यालयात सत्ता केंद्रीत झालीय, या सोनिया गांधींच्या टीकेचंसुद्धा त्यांनी खंडन केलं. पंतप्रधान आणि पंतप्रधान कार्यालय हे घटनेच्या आत येतं, ते घटनाबाह्य नाही, असं मोदी म्हणाले. यूपीए सरकारमध्ये सत्ता घटनाबाह्य व्यक्तींकडे होती, असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे सोनियांना टोला लगावला.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close