गुन्हा दाखल झाल्यानंतर सनी लिओन पोलीस आयुक्तालयात हजर

May 27, 2015 5:33 PM0 commentsViews:

sunny_leone235227 मे : अभिनेत्री सनी लिओनच्या विरोधात डोंबिवलीत गुन्हा दाखल झाल्यानंतर आज आपला जबाब नोंवदण्यासाठी सनी लिओनने ठाणे पोलीस आयुक्तालयात हजेरी लावली. पोलिसांनी तिचा जबाव नोंदवून घेतलाय.

सनी लिओनच्या विरोधात डोंबिवली मधील रामनगर पोलीस ठाण्यात अश्लीलता मोहिमेअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. हिंदू जनजागृती समितीच्या वतीने रणरागिणी शाखेच्या वतीने गुन्हा दाखल करण्यात आला. रणरागिणी शाखेच्या अंजली पालन यांनी सदरचा गुन्हा दाखल केला होता या प्रकरणी जवाब नोंदविण्यासाठी सनी लियोन आज ठाणे पोलिस आयुक्तालयात आपल्या वकील आणि नातेवाईकासोबत आली होती . पोलिस उपयुक्त गुन्हे याच्या कडे तिने आपला जवाब नोंदविला. सनी लिओनने आपल्या संकेत स्थळाद्वारे अश्लीलतेचा प्रसार केल्या प्रकरणी सदरचा गुन्हा दाखल केला होता. या संकेतस्थळावरून तिची नग्न छायाचित्र आणि व्हिडिओ असल्याचा आरोप करत तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या तक्रारीनंतर तिचे म्हणणे आणि जवाब घेण्यासाठी आज सनी लिओन ठाणे पोलीस आयुक्तालयात आली होती.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close