पा सिनेमाचं फर्स्ट लुक लाँच

November 4, 2009 1:38 PM0 commentsViews: 1

4 नोव्हेंबर पा या सिनेमाचं फर्स्ट लुक बुधवारी मुंबईत लाँच झालं. लाँचिंगच्यावळेस अभिषेक बच्चन, विद्या बालन उपस्थित होते. यावेळी अमिताभची गैरहजेरी जाणवत होती. पा सिनेमात अमिताभची मुख्य भूमिका असून सिनेमात अभिषेकच्या मुलाची भूमिका साकारत आहे. आर. बालकृष्णन यांचं दिग्दर्शन असलेला हा सिनेमा आहे. या सिनेमाची कथा प्रोगेरिया या रोगावर आधारित आहे. ज्यात माणसाचं वय हे नॉर्मल वेगापेक्षा कित्येक पटीनं वाढत जातं. अमिताभ बच्चन यांच्या आणखी एका कसदार अभिनयाची ही एक झलक आहे. त्यांच्या या वेगळ्या लूकच्या मेकअपसाठी लॉस एंजेलिसहून खास मेकअप आर्टिस्ट बोलावण्यात आले होते. बिग बीचा हा मेक अप करायला दोन तास लागायचे आणि तेवढेच तास हा मेकअप काढायला लागायचे. बुधवारी अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगवरदेखील या सिनेेमाचा उल्लेख केला आहे.

close