आघाडीचा तिढा सुटला : शुक्रवारी शपथविधी

November 5, 2009 7:33 AM0 commentsViews:

5 नोव्हेंबर काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील खातेवाटपाचा तिढा अखेर सुटला आहे. मंत्रिमंडळाचा शुक्रवारी शपथविधी होण्याची शक्यता आहे. खातेवाटपाबाबत दोन्ही पक्षांमध्ये जवळपास सहमती झाली आहे. काँग्रेसला मुख्यमंत्र्यासह 23 तर राष्ट्रवादीला 20 मंत्रिपदं मिळण्यावर सहमती झाल्याचं समजतं. सूत्रांकडून मिळणार्‍या माहितीनुसार, राष्ट्रवादीचे 20 तर काँग्रेसचे 15 ते 20 आमदार शपथ घेण्याची शक्यता आहे. ए.के. ऍन्टनी दिल्लीत परतल्यानंतर गुरूवारी संध्याकाळपर्यंत बैठक होण्याची शक्यता आहे.

close