पालिकेनं आश्वासनं पाळलं नाही म्हणून आत्महत्येचा प्रयत्न

May 27, 2015 7:01 PM0 commentsViews:

pune palika4427 मे : पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांच्या कार्यालयात यश चव्हाण नावाच्या व्यक्तीने विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

महानगरपालिकेनं दिलेलं आश्वासन पाळलं नाही, म्हणून त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. येरवडा रस्त्यावर वारंवार होणार्‍या अपघातांकडे पुणे महानगरपालिकेचं लक्ष वेधण्यासाठी यश चव्हाण यांनी आमरण उपोषण केलं होतं.

त्यावर पुणे पालिकेच्या आश्वासनानंतर चव्हाण यांचं उपोषण थांबलं होतं. मात्र, महापालिकेने दिलेलं आश्वासन न पाळल्यानं चव्हाण यांनी विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close