26/11 प्रकरणी NSG कमांडोंची साक्ष होणार

November 5, 2009 8:59 AM0 commentsViews: 5

5 नोव्हेंबर मुंबई हल्ल्याच्या सुनावणीत एनएसजी कमांडोंनी साक्ष देण्यात काही गैर नाही, असा आदेश मुंबई हायकोर्टाने दिला आहे. 26/11 प्रकरणात सध्या विशेष कोर्टात खटला सुरू आहे. यावेळी एनएसजी कमांडोना साक्षीसाठी बोलावण्यात आलं होतं. यावेळी एनएसजीनं मात्र असमर्थता दाखवत विशेष कोर्टाच्या आदेशाविरोधात हाय कोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर गुरूवारी मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली. पण साक्षीच्या वेळी एनएसजीच्या कार्यपद्धतीबाबत गोपनीयता बाळगली जावी असे निर्देशही कोर्टाने दिले आहेत.

close