मालमत्ता करावरून सेना-भाजपमध्ये श्रेयवाद

May 27, 2015 7:45 PM0 commentsViews:

sena bjp mumbai bulding234आशिष जाधव,मुंबई

27 मे : मुंबईतल्या मालमत्ता कराचा निर्णय जाहीर झाला आणि शिवसेना- भाजपमध्ये श्रेयवाद सुरू झाला. मुख्यमंत्र्यांच्या घोषणे पाठोपाठ, भाजपनं निर्णय जाहीर करतांना, शिवसेनेला डावल्याचा आरोप शिवसेना आमदार अजय चौधरींनी केलाय.

मुंबईकरांना राज्य सरकारनं अचानक सुखद धक्का दिलाय. 500 फुटांच्या आत घरं असलेल्यांचा मालमत्ता कर पुढचे पाच वर्ष वाढवण्यात येणार नाहीये. मालमत्ता करात 40 टक्के वाढ करण्याची घोषणा राज्य सरकारनं केली होती. त्यामुधे मध्यमवर्गीय मुंबईकर चिंतेत सापडला होता.पण 500 स्क्वेअर फुटांच्या आतल्या घरांना सूट देण्यात आलीये.

या निर्णयाचा फायदा जवळपास 17 लाख मुंबईकरांना होईलं असा सरकारचा दावा आहे. तसंच मुंबईत जी घरं 500 स्क्वेअर फूटांच्या आतली आहेत, त्यांत मध्यमवर्गीय मराठी लोकांची संख्या जास्त आहेत. नवी घरंही या नियमात आहेत. त्यामुळे मध्यमवर्गीय मुंबईकरांना हा मोठा दिलासा आहे.या निर्णयामागे 2017 मध्ये होणार्‍या मुंबई महानगरपालिका निवडणुका असल्याची चर्चा सुरू झालीये.

या निर्णयाचा फायदा मध्यमवर्गीय मुंबईकरांना होईल, पण खरा प्रश्न आहे तो राजकीय फायदा कुणाला होणार ?येत्या काही दिवसांत, श्रेयासाठी शिवसेना-भाजपमध्ये सुरू झालेला कलगीतुरा आणखी वाढला तर आश्चर्य वाटायला नको…

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close