सांगलीत खानापूरमध्ये माकडांचा उच्छाद, 40 जणांना घेतला चावा

May 27, 2015 8:55 PM0 commentsViews:

sangali monkey34527 मे : सांगली जिल्ह्यातील खानापूर शहरामध्ये माकडांच्या टोळीनं धुमाकूळ घातलाय. आठ दिवसांत सुमारे 35 ते 40 जणांना माकडांनी चावा घेतलाय. त्यामुळे नागरिकांचं घराबाहेर पडणंही कठीण झालंय.

इतकंच नव्हे तर शहरातल्या बाजारपेठेमध्ये वानर सेना घुसली की, बाजार बंद करण्याची वेळ येते. माकडांची दहशत एवढी आहे की, लोक घराबाहेर पडायलाही घाबरतायत.

वन-विभाग आणि गावकरी या माकडांचा बंदोबस्त करण्याचा प्रयत्न करतायत, पण त्यांना अजून या माकडांना पकडण्यात यश आलेलं नाही.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close