महागाईने जनता वैतागली

November 5, 2009 9:02 AM0 commentsViews: 12

5 नोव्हेंबरवाढत्या महागाईनं सर्व सामान्य जनता जेरीस आली आहे. धान्य, डाळी आणि भाज्यांचे भाव वाढले आहेत. महागाईनं आता जगणंच मुश्कील केलं आहे. अशी हताश भावना लोकांमध्ये व्यक्त होतेय. यंदा देशभरात पाऊस कमी झाल्याने धान्य आणि डाळींचं उत्पादन कमी झालं आहे. साहजिकच बाजारपेठांमध्ये मालाची आवकही कमी झाली. याचाच फायदा घेऊन साठेबाजांनी भाव वाढवले. सरकारनं साठेबाजांना मदत करत असल्याचा आरोप निलम गोर्‍हेंनी केला आहे. निवडणूकांपूर्वी जीवनावश्यक वस्तूंचे दर काही काळ स्थिर राहीले. पण आता राजकीय अस्थिरतेमुळं महागाई वाढतच राहण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. जनतेनं स्थिर सरकारसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीला बहुमतानं निवडून दिलं. पण आता हेच काँग्रेसवाले महागाईला कारणीभूत ठरत असल्याची भावना जनतेतून व्यक्त होत आहे.

close