पद्मसिंह पाटलांना 7 दिवसात अटक करा : सुप्रिम कोर्टाचा आदेश

November 5, 2009 9:04 AM0 commentsViews: 1

5 नोव्हेंबर खासदार पद्मसिंह पाटलांना सात दिवसांत अटक करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टानं दिले आहेत. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हत्येची सुपारी दिल्याप्रकरणी पद्मसिंह पाटील यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणी पाटील हे अटक पूर्व जामीनासाठी सुरुवातीला हायकोर्टात गेले होते. तिथे त्यांच्या अटकपूर्व जामीनाचा अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी सुप्रिम कोर्टात अर्ज केला होता. मात्र, आता सुप्रिम कोर्टानंही त्यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. कोर्टाने दिलेल्या आदेशामुळे पद्मसिंहांना अटक होण्याची शक्यता आहे.

close