80 वे अखिल भारतीय नाट्यसंमेलन अमेरिकेत

November 5, 2009 9:06 AM0 commentsViews: 5

5 नोव्हेंबर या वर्षीच 80 वं अखिल भारतीय नाट्य संमेलन लॉस एंजिलेसमध्ये होणार आहे. बीडमध्ये झालेल्या 79 व्या नाटयसंमेलनात संमेलनाध्यक्ष मोहन जोशी यांनी पुढील संमेलन परदेशात होईल असंं म्हटलं होतं. त्यानूसार 80 वं नाट्यसंमेलन अमेरिकेत होणार आहे. 28 ते 31 मे या काळात संमेलनाच्या तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत. याआधी अमेरिकेतील सॅन हौजेत मराठी साहित्य संमेलन झालं होतं. आता नाट्यसंमेलनही सातासमुद्रापार होत आहे. मात्र तेव्हा एक साहित्य संमेलन परदेशात तर दुसरं महाबळेश्वरला झालं होतं. तसंच एक नाट्य संमेलन महाराष्ट्रात होईल का ? याबाबत आता उत्सुकता आहे.

close