बोपखेल प्रकरणी मनोहर पर्रिकर घेणार बैठक

May 28, 2015 1:12 PM0 commentsViews:

parikar28 मे : पिंपरी चिंचवडच्या बोपखेल प्रश्नी संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी अखेर लक्ष घातलंय. पर्रीकर आज (गुरुवारी) दुपारी पुण्यात बैठक घेणार आहेत. या बैठकीला पुण्याचे सर्व आमदार आणि खासदार उपस्थित राहणार आहेत. संरक्षण विभागानं बोपखेलमधला रस्ता बंद केल्यानं ग्रामस्थ रस्त्यावर उतरले होते. गेल्या आठवड्यात लष्कर आणि ग्रामस्थांमध्ये तुफान संघर्ष झाला होता. याप्रकरणी 200 जणांना ताब्यातही घेण्यात आलं होतं.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close