सुर्य कोपला, देशभरात उष्माघाताचे 1400 बळी

May 28, 2015 1:24 PM0 commentsViews:

andhara hit28 मे : मे महिन्याच्या अखेरीस सुर्यदेवांची  रौद्ररूप धारण केल्यामुळे देशभरात उष्णतेची लाट आलीये. उष्णतेच्या लाटेत आतापर्यंत 1400 लोकांचा बळी गेलाय. आणखी काही दिवस उष्णतेची लाट कायम राहणार असा हवामान खात्याने अंदाज व्यक्त केलाय.

आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये उष्माघातामुळे मृतांची संख्या 1 हजार 360 वर पोहचलीये. एकट्या आंध्र प्रदेशात 1 हजार 20 बळी गेलेत, तर तेलंगणात 340 बळी गेलेत. ओडिशामध्ये आतापर्यंत उष्माघाताचे 60 बळी गेले आहे. तितलागडमध्ये आतापर्यंतचं उच्चांकी तापमान 47.6 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलंय. ओडिशामधलं तापमान येत्या दोन ते तीन दिवसांत कमी होईल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. तर दिल्लीतही अति उष्णतेनं दोन जणांचा मृत्यू झालाय. आग्रामध्ये 46 अंश इतकं तापमान नोंदवलं गेलंय. पंजाब, हरियाणा आणि राजस्थानमध्येही उष्णतेची लाट कायम आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close